घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'हर हर महादेव' चित्रपटावरून राष्ट्रवादी, स्वराज्य आणि मनसे आमनेसामने

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून राष्ट्रवादी, स्वराज्य आणि मनसे आमनेसामने

Subscribe

नाशिक : राज्यभरात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वादंग निर्माण झालेला असताना नाशिक मध्येही त्याचे पडसात उमटू लागले आहेत. दोनच दिवसापूर्वी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील दृश्यांच्या तसेच मावळ्यांच्या बाबत संताप व्यक्त केला होता. त्याचवेळी ‘हर हर महादेव’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या लढाईच्या घटनाक्रमावर प्रश्न उपस्थित केला होता. अश्या प्रकारे इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी संभाजीराजे यांनी दिला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही संभाजी राजेंच्या भूमिकेचे समर्थन करत ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाला चित्रपट म्हणून बघावे असे आवाहन करण्यात आले. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसेने चित्रपटगृहात धाव घेत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरूच ठेवावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वराज्य संघटना, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी चित्रपटगृह चालकांना निवेदन देत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो चालू केल्यास जे काही होईल त्याला चित्रपटगृह चालक स्वता जबाबदार असतील असा इशारा दिला आहे. यासर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व चित्रपटगृह चालकांनी वाद शमत नाही तोपर्यंत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटावरून होणार्‍या वादामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून शहरातील चित्रपटगृहांवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -