घरमहाराष्ट्रधुळे - सूरत हायवेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळून ४ जणांचा...

धुळे – सूरत हायवेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू

Subscribe

नंदूरबार जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळून त्यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स गाडी दरीत कोसळली. धुळे – सूरत नॅशनल हायवेवर कोंडाबाई घाटात हा भीषण अपघात घडला. ही ट्रॅव्हल्स जळगावहून सूरतकडे जात असताना कोंडाबाई घाटातील दर्ग्याजवळ पूलावरून थेट ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली.

- Advertisement -

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तातडीने दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहितील पोलिसांनी दिली असून अपघात भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. तर नेमका अपघात कसा झाला याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ट्रॅव्हल्सही प्रवाशांनी भरली होती.

हेही वाचा –

पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांच्या अपेक्षाभंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -