घरठाणेठाण्यात ६५९ जणांची वाहतुक पोलिसांनी उतरवली झिंग

ठाण्यात ६५९ जणांची वाहतुक पोलिसांनी उतरवली झिंग

Subscribe

ठाणे । सरत्या आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे जल्लोष करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या किंवा मद्यप्राशन करून मागील सिटीवर बसून प्रवास करणाऱ्या अशा एकूण ६५९ जणांची ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या तीन दिवसात ठाणे वाहतूक पोलिसांनी झिंग उतरवली आहे. यामध्ये ३१ डिसेंबरला २३२ तर १ जानेवारीला २७० जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या एकूण तीन दिवसांच्या कारवाई ५७२ दुचाकीस्वारांवर तर ५५ चारचाकी आणि ३२ तीनचाकी वाहन चालकांचा समावेश असून ही कारवाई वाहतूक पोलीस ऍक्ट १८५ आणि १८८ प्रमाणे करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत सरत्या व नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने ठाणे वाहतूक पोलीसांकडून विविध ठिकाण प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तसेच नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून विचार करून या वर्षी देखील विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन केले होते. त्याकरीता ५५ अधिकारी ६०० पोलीस कर्मचारी तैनात केले होते. तसेच सर्व बार चालक, मालक यांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहक मद्यप्राशन करून वाहन चालविताना मिळून येतात, अशा ग्राहकांकरीता चालक उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या होत्या. याशिवाय सध्या कोरोना (कोव्हिड-१९) या विषाणुचा संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आलेली असून पुन्हा कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश सूचना यांचे आधीन राहून ब्रेथ अॅनालायझर मशिन ठाणे वाहतूक विभागकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या होत्या.

- Advertisement -

तर वाहतूक विभागकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी (दुचाकी, चारचाकी) वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ३० डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी १५६ केसेस दाखल केल्या आहेत. तसेच ३१ डिसेंबरला २३३ आणि १ जानेवारीला २७० केसेस दाखल केल्या आहेत. या केसेस वाहतूक पोलीस अॅक्ट १८५ आणि १८८ प्रमाणे केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -