घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचा हटके फोटो शेअर करत आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

उद्धव ठाकरेंचा हटके फोटो शेअर करत आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. अनेकांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा दिले आहेत. दरम्यान, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांना खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा एक हटके पण कूल लूक असणारा फोटो शेअर केला आहे. दोघांचाही लूक हटके दिसत असून परदेशात असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना एकसारखाच मजकूर ट्विट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

- Advertisement -

एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून त्यांनी ठाकरेंचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. पण त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख या उपाधीचा उल्लेख त्यांनी टाळला आहे.

- Advertisement -

माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते मला रोजच मी करत असलेली प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करतात. तेही प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे, अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.


हेही वाचा :‘तुम्हाला घरचंच जेवण लागतं;’ चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं मजेशीर उत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -