घरमहाराष्ट्रधर्मांधांचा उन्माद आणि वाद

धर्मांधांचा उन्माद आणि वाद

Subscribe

पीएफआयवरील कारवाईच्या निषेधार्थ पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा

केंद्रीय तपास यंत्रणांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) कारवाईचा बडगा उगारल्यानंतर धर्मांधांनी पुन्हा एकदा आपला उन्माद करण्यास सुरुवात केली आहे. पीएफआयवरील कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील आंदोलनादरम्यान काही धर्मांधांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. याबाबतची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून याचा तपास सुरू केला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर याचे पडसाद राजकारणातही उमटण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएफआयवर देशभरात छापेमारी केली. देशभरातील विविध राज्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर बेधडक छापे टाकत तपास यंत्रणांनी काही कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या छापेमारीनंतर केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये याचे पडसाद उमटले. अनेक राज्यांमध्ये याविरोधात आंदोलने करण्यात आली. पुण्यातही शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले होते, परंतु यावेळी काही धर्मांधांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर पोलिसांनीही याची दखल घेत याप्रकरणी 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पीएफआयच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी; ईडीचा दावा
पीएफआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्यत्र हल्ले करण्याचा कट रचला होता, असा दावा ईडीने केला आहे. यावर्षी जुलै महिन्यात 12 तारखेला बिहारची राजधानी पाटणा येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत स्फोट घडविण्याचा कट रचून त्यासाठी प्रशिक्षणही घेतले होते. पंतप्रधानांच्या दैनंदिन कार्यक्रमांवर त्यांची नजर होती. शिवाय इतर ठिकाणी हल्ले करण्यासाठी टेरर मॉड्यूलही तयार करण्यात येत होते. त्याद्वारे शस्त्रे आणि स्फोटके जमा करण्यात येत होती. पाटण्यात पीएफआयच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली होती. त्यात इंडिया 2047 नावाचे एक बुकलेटही होते. हे बुकलेट म्हणजे 2047पर्यंत भारताला मुस्लीम देश बनवण्याची दहशतवादी ब्लूप्रिंट होती, असा ईडीचा दावा असल्याची माहिती आहे.

पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

- Advertisement -

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांना सोडणार नाही. त्यांना शोधून त्यावर कारवाई करू. महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पीएफआय संघटनेकडून देशात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जात असून त्यांच्या चौकशीदरम्यान ईडीला अनेक पुरावे सापडले आहेत.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर, अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा. यातच हिंदुस्थानाचे हित आहे.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणार्‍या आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -