घरमहाराष्ट्रअखेर विशेष समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

अखेर विशेष समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचे कामकाज चालवण्यासाठी सल्लागार समित्यांवर नगरसेवकांची निवड केली जाते. महापालिकेने अशी निवड गेल्या दीड वर्षात केली नव्हती. याबाबत ‘आपलं महानगर’मध्ये दिनांक 31 जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. याची गंभीर दखल घेत महापौर आणि पालिका प्रशासनाने या समित्यांवर सदस्यांची निवड गुरुवारी सभागृहात जाहीर केली.

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38 अन्वये 9 सल्लागार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात अनुदान सहाय्य समिती, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना अंमलबजावणी समिती, महाराष्ट्र संस्कृती दर्शन समिती, आश्वासन समिती, नियोजन समिती, पुनर्विलोकन समिती, छाननी समिती, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास समिती, प्रभाग समिती समस्या निवारण समिती व समन्वय समितीचा समावेश आहे.

- Advertisement -

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये संपन्न झाली होती. मार्चमध्ये महापौरांची निवड करण्यात आली होती. महापौरांच्या निवडीनंतर या समित्या पुनर्जिवीत करण्यात आल्या होता. मात्र गेल्या दीड वर्षात या समित्यांवर नगरसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नव्हत्या. ‘आपलं महानगर’ याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यावर महापौरांनी व पालिकेच्या चिटणीस विभागाने समित्यांवर नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरु केली होती. गुरुवारी या समित्यांवरील सदस्यांच्या निवडीची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहात केली.

समित्यांवरील निवड –

शिवसेनेचे 93, भाजपचे 85, काँग्रेसचे 30, राष्ट्रवादीचे 9, समाजवादीचे 6, एमआयएमचे 2 तर मनसेचा 1 नगरसेवक आहे. राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या आकडेवारीनुसार अनुदान सहाय्य समितीवर शिवसेनेचे 8, भाजपचे 7, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची निवड करण्यात आली. तर महाराष्ट्र संस्कृती दर्शन समिती, आश्वासन समिती, नियोजन समिती, पुनर्विलोकन समिती, छाननी समिती, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास समिती, प्रभाग समिती समस्या निवारण समितीवर शिवसेनेचे प्रत्येकी 5, भाजपचे प्रत्येकी 4 तर काँग्रेसच्या प्रत्येकी 2 नगरसेवकांची निवड करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -