घरताज्या घडामोडीतुकाराम मुंढेंना सपोर्ट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अचानक त्यांची बदली का केली? वाचा आतली...

तुकाराम मुंढेंना सपोर्ट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अचानक त्यांची बदली का केली? वाचा आतली बातमी

Subscribe

डॅशिंग, धडाकेबाज अधिकारी म्हणून बिरुदावली मिरवणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरुन त्यांना हटवलून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्याजागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील. मुंढे आणि नागपूर मनपातील लोकप्रतिनिधींसाठी बदलीचा हा विषय तसा नवीन नाही. मुंढेंची नेहमीच बदली होत असते, तर नागपूर मनपातून त्यांच्या बदलीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून दबाव आणला जात होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र महिन्याभरापुर्वीच तुकाराम मुंढे यांचे जाहीर समर्थन केले होते. सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची पाठराखण केली होती. मात्र एका महिन्यातच मुख्यमंत्र्यांचे छत्र या धडाकेबाज अधिकाऱ्याच्या डोक्यावरुन उडाल्याचे चित्र दिसत असून मुंढे यांची १५ वर्षात १५ व्या वेळा बदली झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचा शब्द काय होता?

२६ जुलै रोजी सामनाचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कामाचे कौतुक करत त्यांची पाठराखण केली होती. महापालिका की आयुक्त यापैकी काय निवडाल? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘प्रामाणिक आयुक्त’ असे उत्तर दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्र्यांचा मुंढेंना पुर्ण पाठिंबा असल्याचे चित्र दिसत होते. ठाकरे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठिशी ठाम उभे असल्याचा संदेश राज्यात गेला होता. मात्र एका महिन्यातच सर्वपक्षीय नगरसेवकांचा दबाव, सरकारमधील मंत्र्यांचीच नाराजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे दिल्लीतील प्रयत्न आणि शरद पवार यांच्याशी असलेले संबंध यामुळे अखेर नाईलाजाने का होईना, पण मुंढेंची उचलबांगडी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -
Shri Tukaram Mundhe IAS Transfer Order Dt.
बदली संदर्भातील ऑर्डर

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील वक्तव्य ऐका –

People of Nagpur should support Tukaram Mundhe, says Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray

Nagpur people should support Tukaram Mundhe, says Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray#TukaramMundhe #NMC #UddhavThackeray #Saamana #SanjayRaut #Maharashtra #ChiefMinister #NagpurMunicipalCorporation Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray in an exclusive interaction with Shiv Sena Rajya Sabha MP and Editor at ‘Saamana’ Sanjay Raut speaks about Nagpur Municipal Corporation (NMC) Commissioner Tukaram Mundhe. Thackeray urges people of Nagpur to support Mundhe as he’s working for the betterment of the people. Video courtesy: Saamna

Posted by Nation Next on Sunday, July 26, 2020

काय आहेत बदलीची कारणे?

फेब्रुवारी २०२० मध्ये तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्र्यांचे शहर आणि भाजपची सत्ता असल्यामुळे महाविकास आघाडीने मुंढेंना तिथे धाडले होते. मात्र नागपूरमध्ये पाऊल ठेवताच मुंढेंनी आपल्या स्टाईलने प्रशासन हाकायला सुरुवात केली. नागपूरमधील अवैध, बेकायदेशीर बांधकामाला लगाम घालणे, कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, लोकप्रतिनिधींना न जुमानता निर्णय घेणे मुंढेंनी सुरु केले. यामुळे महापौर संदीप जोशी आणि सर्वपक्षीय नगरसेवकांचे मुंढेंसोबत खटके उडायला लागले.

- Advertisement -

यावर कडी म्हणून की काय मुंढे यांनी अवैधरित्या ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओपद बळकावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गडकरींनी मुंढेंची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली होती. तसेच शरद पवार यांच्याशी गडकरी यांचे चांगले संबंध आहेत. गडकरी यांनी पवारांकडे देखील हा विषय मांडला असल्याचे खास सूत्रांनी सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतरही मुंढे यांच्या एककल्ली कारभारावर महापौर आणि नगरसेवकांकडून टीका होत होती. कालच मुंढे यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली होती. आज त्यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर क्वारंटाईन असलेले मुंढे राधाकृष्णन बी. यांना फोनवरूनच पदभार देणार आहेत. कोरोनामुळे मुंढे सध्या क्वारंटाईन आहेत.

हे वाचा – आयुक्त तुकाराम मुंढेंसहीत इतर १५ सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या

महाविकास आघाडीचाही बदलीमागे हात

महापौर, नगरसेवक आणि खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. त्याशिवाय महाविकास आघाडीमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी देखील मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंढे यांचे कर्तृत्व आडवे आले?

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मुंढे हे आपल्या हेकेखोर स्वभावासाठी देखील परिचित आहेत. याआधी पुण्यात पीएमपीएलचे आयुक्त, नवी मुबंई मनपा आयुक्त, नाशिक मनपा आयुक्त आणि नागपूर मनपा आयुक्त असताना त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणेच काम सुरु ठेवले. कर्मचारी आणि सहकाऱ्यांना कमी लेखने, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा हटकून अपमान करणे, माध्यमांशी थेट बोलणे आणि लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावणे अशी नायक स्टाईल कामगिरी मुंढे जिथे जातील तिथे करत असतात.

त्यांच्या या कर्तृत्वामुळेच नागरपूर मनपातील कर्मचारी देखील हैराण झाले होते. मुंढे बोलत असताना केवळ फोन वाजला म्हणून एका कर्मचाऱ्याला जाहीर अपमानित केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे मुंढेंची बदली व्हावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून दबाव वाढला होता, त्यातून त्यांची बदली झाल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -