घरमहाराष्ट्रजातीव्यवस्थेबाबत मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यानंतर संघाकडून 'पंडित'बाबत खुलासा

जातीव्यवस्थेबाबत मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यानंतर संघाकडून ‘पंडित’बाबत खुलासा

Subscribe

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेबद्दल पंडितांना जबाबदार धरले आहे. काही पंडित धर्मग्रंथांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे, असे सरसंघचालक म्हणाले होते. आता याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पंडित’ तसेच त्यांच्या वक्तव्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

पंडित या शब्दाला काही जणांनी आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी खुलासा केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘पंडित’ म्हणजे ‘विद्वान’ असा उल्लेख केला आहे. सत्य हे आहे की, परमेश्वर सर्व प्राणिमात्रांमध्ये आहे. त्यामुळे रूप, नाव काहीही असले तरी योग्यता एकच आहे. मानसन्मान एक आहे. प्रत्येकाबद्दल आपलेपणा असतो. कोणीही उच्च किंवा नीच नाही. धर्मग्रंथांचा आधार घेऊन काही विद्वान जे जातीवर आधारित उच्च-नीचतेबद्दल बोलतात ते खोटे आहे, असा खुलासा सुनील आंबेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते सरसंघचालक?
मुंबईत रविवारी संत रोहिदास जयंती सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. प्रत्येक काम समाजासाठी असते, तर कोणी उच्च, कोणी नीच किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात? केवळ स्वत:चाच विचार करणे आणि आपलीच उपजीविका करणे एवढाच धर्म नाही. समाजाप्रती देखील आपली जबाबदारी आहेच. सत्य हेच ईश्वर आहे… नाव, पात्रता आणि सन्मान काहीही असले तरी सर्व समान आहेत आणि त्यात काहीही फरक नाही… काही पंडित धर्मग्रंथांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे…, असे सरसंघचालक म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -