घरमहाराष्ट्र'त्या' वादग्रस्त विधानानंतर अखेर रावसाहेब दानवे बोलले

‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर अखेर रावसाहेब दानवे बोलले

Subscribe

'राज्यसभेत विरोधकांकडून लोकशाहीची पायमल्ली'

‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. औरंगाबाद येथून पत्रकार परिषद घेत यावेळी ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने शेतीविषयक तीन कायदे मंजूर केलेत. लोकसभेत या तिनही कायद्यांवर दोन्ही बाजूंवर चर्चा करण्यात आली या चर्चेत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला आणि या कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर चर्चा करण्यात आली. दरम्यान यावर विरोधकांनी आपली मतं मांडली. मत मांडतांना कोणताही गोंधळ झाला नाही मात्र मतदान घेताना विरोधकांनी गोंधळ घातला. लोकशाहीची पायमल्ली केली.’

तसेच, लोकशाहीत मतदानाची पद्धत आणि जनतेचा त्या प्रक्रियेवर असलेला विश्वास ही आपली परंपरा आहे. मात्र गोंधळ घालून विधेयक थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू, भाजपाचं सरकार असल्याने हे विधेयक पास झालं. यासह गेल्या १५ दिवस या कायद्यांविरोधात गैरसमज पसरवले गेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्यव्य केलं. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली होती. दरम्यान यावरूनच महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.

असं म्हणाले होते रावसाहेब दानवे

जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवलं असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. दरम्यान या विरोधात राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली.


मला पाडून दाखवाच; मुनगंटीवांरांना अजित पवारांचं आव्हान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -