घरमहाराष्ट्रकल्याणमध्ये रंगणार अहिराणी साहित्य संमेलन

कल्याणमध्ये रंगणार अहिराणी साहित्य संमेलन

Subscribe

खान्देशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अहिराणी साहित्यिक या कार्य्रमाला हजर राहणार आहेत. या कार्यक्रमात शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांना 'खान्देशना हिरा' आणि ज्येष्ठ अहिराणी साहित्यिका लतिका चौधरी यांना 'खन्देशनी हिरकण' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

आपली भाषा ही आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. शिवाय, आपली संस्कृती टिकवणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण भाषा ही आपली ओळख असते. एकमेकांशी संवाद साधण्याचे महत्वाचे माध्यम असते आणि ती पिढ्यांपढ्यांपासून प्रवास करत सारितेसारखी वाहत असते. ही सरिता अनेक संकटातून आणि संघर्षातून वाहत असते. सध्या इतर भाषेतील शब्दांच्या अतिक्रमानातील संघर्ष आणि सुशिक्षित तरुणांनी या बोलीभाषेकडे फिरवलेली पाठ यामुळे बोलेभाषा रूपाच्या नद्या आटत चालल्या आहेत. ही नदी पुन्हा व्हायला हवी. बोलीभाषेच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उजळायला हवं म्हणून ती टिकवणं फार गरजेचे आहे. याच जाणिवेतून खान्देश हित संग्राम आणि खान्देश साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे २ मार्च रोजी अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण , डोंबिवली, आंबेरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी आदी ठिकाणी अहिराणी भाषिक नागरिकांची संख्या जास्त आहे. या सर्व अहिराणी भाषिक नागरिकांनी संमेलनाला येऊन संमेलनाचा आनंद लुटावा, असे सामाजिक कार्यकर्ते आणि या संमेलनाचे संयोजक उल्केश पवार यांनी सांगितले आहे.

अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा

खान्देश हित संग्राम आणि खान्देश साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारे हे संमेलन २ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल.  या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांना ‘खानदेशना हिरा’ आणि ज्येष्ठ लेखिका ‘लतिका चौधरी’ यांना ‘खानदेशनी हिरकण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कवी सुनील गायकवाड हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. तर कवी प्रा. सदाशिव सूर्यवंशी कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. या कार्यक्रमात खान्देशातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अहिराणी साहित्यिकांची उपस्थिती असणार आहे.

- Advertisement -

पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर एकांकिका

या संमेलनात पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर एकांकिका सादर केली जाणार आहे. खान्देशात पाणी ही भयंकर आणि भीषण समस्या आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जवय आसू सरतस’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे. त्याचबरोबर या एकांकीकेच्या माध्यमातून ‘नारपार धरण’ संदर्भात जागृती केली जाणार आहे.

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रमाचा पत्ता 

हा कार्यक्रम कल्याणच्या चिकणघर येथील मंगेशी बॅंक्वेट हॉल (छत्री बंगला जवळ) येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी सकाळी ११.०० वाजेपासून सुरु होणार आहे. सर्व अहिराणी साहित्यिकांनी आणि खान्देशी नागरिकांनी संमेलनाला यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -