घरताज्या घडामोडीअजितदादांनी केली राज ठाकरेंची नक्कल, व्यासपीठावर नाकावरुन रुमाल फिरवत लगावला टोला

अजितदादांनी केली राज ठाकरेंची नक्कल, व्यासपीठावर नाकावरुन रुमाल फिरवत लगावला टोला

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांची नक्कल करत त्यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीसुद्धा राज ठाकरेंनी नक्कल केली आहे. आता अजित पवार यांनीच राज ठाकरेंची नक्कल करुन टोला लगावला आहे. राज ठाकरेंसारखेच अजित पवारांनी नाकावरुन रुमाल फिरवत त्यांच्या सभेतील वाक्य म्हटलं आहे. औरंगाबादमधील सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नक्कल केली आहे. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा जातीयवादाचा आरोप केला आहे. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला महत्त्व द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट त्यांनी लावली आहे. शरद पवार जातीयवादी आहेत की नाही हे नाशिककरांना चांगले माहिती आहे. तसेच राजू शेट्टी, रामदास आठवले आणि यांनी सांगितले आहे की, शरद पवार जातीयवादी नाहीत. पवारांची राजकीय प्रवास तुमच्यासमोर आहे. एखाचा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्तव द्यायचे काय कारण असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

- Advertisement -

अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल

दरम्यान मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंची नक्कल करण्यासाठी नॅपकिन मागितला आणि नाकावरुन फिरवला, राज ठाकरे नाकावरुन रुमाल फिरवतात तसाच अजित पवारांनी फिरवला आणि म्हणाले की, काय पुसतात, काय एकदाच आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारख काय ते नाकाला नॅपकिन लावायचा असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. तसेच अजित पवार म्हणाले की, कधीतरी १५ ते २० दिवसांनी एखादी सभा घ्यायची ती पण संध्याकाळी घ्यायची उन्हामध्ये नाही. सूर्य मावळल्यानंतर वातावरण थोडं बर झाले का सभा घेतात अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुलाखत घेताना काय कौतुक करायचे – अजित पवार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात बोलत होते. त्यावेळी काय काय भाषणं केली. परंतु आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि तेच तेच होते. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. फक्त फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतात. यांनीच एकेकाळी मुलाखत घेतली तेव्हा किती कौतुक केलं होते असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारुन महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -