घरमहाराष्ट्रईव्हीएम मशिन्सवर माझा विश्वास आहे - अजित पवार

ईव्हीएम मशिन्सवर माझा विश्वास आहे – अजित पवार

Subscribe

काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मशिन्समध्ये शोध असल्याचे विधान करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा ईव्हीएम मशिन्सवर संपूर्ण विश्वास असल्याचे विधान केले आहे.

काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मशिन्समध्ये शोध असल्याचे विधान करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक आपली भूमिका बदलेली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते ईव्हीएम मशिनविरोधात असताना अजित पवार यांनी याच्या समर्थनार्थ नागपुरात वक्तव्य केले होते. मात्र आता निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) सदोष असल्याची ओरड अनाठाई असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईव्हीएमवर माझा संपूर्ण विश्वास असून ईव्हीएम सदोष नसल्याचे मत आहे अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे जर एखादी वस्तू सदोष असल्याचा आरोप करतो, त्यावेळी आरोप करणाऱ्यांनी नेमका दोष काय हे तंत्रशुद्ध प्रमाणित करणे देखील गरजेचे असते. ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाने अनेकदा राजकीय पक्षांकडून हरकती मागवल्यात. परंतु, आजतागायत कुणीही ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या कशी सदोष आहे हे सिद्ध केलेले नाही. त्याचप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम सदोष नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपचा परभाव झाला नसता

बिहार, पंजाब आणि कर्नाटक मधील निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. त्याठिकाणी भाजपचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुजरात निवडणुकीत भाजपला अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. जर ईव्हीएम दोषपूर्ण असते तर याठिकाणी भाजपचा परभाव झाला नसता. लोकशाही व्यवस्थेत जर एखादा पक्ष किंवा व्यक्तीचा पराभव झाल्यास तो मान्य करणे शिकायला हवे असा टोलाही पवार यांनी लगावला. तसेच २०१४ मध्ये ईव्हीएम नव्हे तर मोदी लाटेमुळे भाजपला बहुमत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या विजयाचे श्रेय भाजप नव्हे तर मोदींचे होते असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर महाआघाडीत आल्यास त्यांचे स्वागत

आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेला थोपवण्यासाठी समविचारी, सेक्युलर पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने येत्या २ नोव्हेंबर रोजी संभाव्य महाआघाडी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांच्यासह इतर समविचारी पक्ष आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एआयएमआयएम सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएमआयएम हा पक्ष सेक्युलर नसून त्याचे राजकारण कसे चालते हे सर्वांना ठाऊक आहे. औरंगाबद मेळाव्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांशी संपर्क केला होता. परंतु, त्यांना मोठ्या नेत्यांशी बोलायचे होते, आंबेडकर मोठे असल्यामुळे त्यांना मोठ्याच लोकांशी बोलावेसे वाटत असेल अशी कोपरखळी देखील पवार यांनी मारली. तसेच आंबेडकर महाआघाडीत आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राज्यात दुष्काळ जाहीर करावा

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ परिस्थिती असताना मुख्यमंत्री दुष्काळसदृष्य परिस्थीती असा शब्द प्रयोग करतात. त्याऐवजी शासनाने थेट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पक्षभेद विसरून चर्चेने तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले. राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी ४ वर्षे पूर्ण होत असून युती सरकार जनतेच्या अपेक्षांवर अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

वाचा – गरळ ओकण्यापेक्षा बाळासाहेबांचे स्मारक बांधा; अजित पवारांचा पलटवार

वाचा – अजित पवार म्हणजे ‘गटारातील किडा’ – सामना

वाचा – जलयुक्त शिवारचे ७.५ हजार कोटी गेले कुठे – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -