घरमहाराष्ट्रAjit Pawar : "विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड...", अजित पवारांनी पत्रकाद्वारे मांडली भूमिका

Ajit Pawar : “विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड…”, अजित पवारांनी पत्रकाद्वारे मांडली भूमिका

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 9 महिने झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशली मीडियावर एक पत्र प्रसारित करत राज्यातील जनतेला आपल्या वेगळ्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. ‘विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, अशी भावना अजित पवार यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर पत्रकात 10 मुद्द्यांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवारांनी पत्रकात म्हटले,विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कथीच नसेल.”

- Advertisement -

हेही वाचा – Resident Doctors : निवासी डॉक्टरांचा संप मागे; राज्य सरकारने वाढवले विद्यावेतन

सत्ता असेल तरच…

कायमच वडीलाधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतूनव्हता व नसेल”, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

या पत्रकाच्या शेवटी अजित पवार म्हणाले, “या पुढील काळातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत याव, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद द्यावा,” असे विनम्र आवाहन करतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -