घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसें केवळ । काइं फेण पितां जळ । सेविलें होय ॥
त्याचप्रमाणे हे विस्तार पावलेले जग जाणल्याले निर्दोष अशा मला जाणता येईल का? फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का?
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें । मग येथिंचीं जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥
म्हणून मायामोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रमाने मानून, तेथील जन्ममरणादी सर्वस्थिती मलाही आहेत असे समजतात.
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥
याप्रमाणे नामरहित, क्रियारहित व देहरहित असा जो मी त्या मला नामधारी, कर्मकारी व देहधर्मानी युक्त असणारा असे समजतात.
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥
मला निराकाराला अकार, निरुपाधिकाला उपचार, विधिनिषेधादिक अशा मला आचारादिक व्यवहार.
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥
मला जातिरहिताला जात, गुणातीताला गुण, चरणरहिताला चरण, हस्तरहिताला हस्त.
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजीं वन । निदेला देखे ॥
मज परिमाणातीताला परिमाण, सर्वव्यापकाला ठिकाणी; ज्याप्रमाणे अंथरुणात निजलेला वनाची शोभा स्वप्नांत पाहतो.
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥
त्याप्रमाणे कर्णरहिताला कान, नेत्रहिताला नेत्र, गोत्ररहिताला गोत्र, निराकाराला रूप.
मज अव्यक्तासी व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥
अव्यक्त असा जो मी त्या मला व्यक्ती, निरिच्छास इच्छा व जो मी स्वयमेव तृप्त आहे त्यास तृप्ती, अशा कल्पना करितात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -