घरताज्या घडामोडीराज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न सुटण्याची शक्यता, अजित पवार यांनी दिले संकेत

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न सुटण्याची शक्यता, अजित पवार यांनी दिले संकेत

Subscribe

राज्यपालाची वेळ घेऊन राजभवनावर जायचे आणि चर्चा करायाची आहे

राज्यपाल नियुक्त नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवड्यात सुटण्याची चिन्हे आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आपल्याला चर्चेसाठी बोलावले आहे आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यपाल नियुक्ती बारा आमदारांच्या नावाची यादी राज्य मंत्रीमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्याकडे पाठवली आहे. पण त्यावर राज्यपालांनी अजून निर्णय घेतला नाही. या नियुक्तीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. पण आता लवकरच हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की. नवनियुक्त लोकायुक्त विद्याधर कानडे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आपण स्वतः आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे व मंत्रीमंडळातील सहकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर चहापानाच्या वेळेस राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय झाला. त्यावर राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, तुम्ही एकदा या आपण या संदर्भात बोलू, त्यामुळे मी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठरवले आहे की, पुढील आठवड्यात राज्यपालाची वेळ घेऊन राजभवनावर जायचे आणि चर्चा करायाची आहे असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीत राज्यपालांनी जबाबदारीचे भान ठेवत बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने नमूद केले आहे. संविधानाने दिलेल्या सर्वोच्य अधिकारानुसार राज्यपाल कोणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे न्यायालय त्यांना निर्देश देऊ शकत नाही. पण अशा प्रकारे अनिश्चित काळासाठी संविधानिक जागा रिकाम्या ठेवता येणार नाही. याची कारणीमीमांसा होणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना राज्यपाल कोश्यारी आता तरी बारा आमदार नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


हेही वाचा : “ही संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सुचना”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -