घरताज्या घडामोडीAjit Pawar : विजय शिवतारेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची महायुतीच्या नेत्यांना समज; म्हणाले...

Ajit Pawar : विजय शिवतारेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची महायुतीच्या नेत्यांना समज; म्हणाले…

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले तरी माजी आमदार विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवरही निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले तरी माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवरही निशाणा साधला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं. मात्र त्यांनी महायुतीतील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना ‘राजकीय वातावरण खराब होईल, वातावरणात गडुळपणा येईल अशी वक्तव्य करू नका’ अशा शब्दांत समज दिली. (ajit pawar shiv sena vijay shivtare ncp mahayuti)

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111वी जयंती आहे. यशवंतरावांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील प्रीतीसंगम बाग येथे जाऊन उपुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार यांना शिवसेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सर्वप्रथम अजित पवारांनी याबाबत ‘मला काहीच बोलायचं नाही’, असे सांगत उत्तर देणं टाळलं. मात्र “सुसंस्कृतपणा सर्वांनी दाखवाव. त्याबाबत वरिष्ट पातळीवर निर्णय घेण्यात येईल. त्यामध्ये आमचा राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजप यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील प्रमुखांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय वातावरण खराब होईल, वातावरणात गडुळपणा येईल असे वक्तव्य करू नये”, अशी समज महायुतीतील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना दिली.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले होते विजय शिवतारे?

“सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या जनतेचा आहे. तसेच पवार इथे येऊन माफी मागणार का? बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही”, असे वक्तव्य शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केले.


हेही वाचा – Ajit Pawar : कोणी खेकडा म्हणतो, कोणी वाघ म्हणतं; अजित पवारांचा टोला कोणाला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -