घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : महायुतीत कोणाला कशा मिळणार जागा; अजित पवारांनी सांगितला...

Lok Sabha 2024 : महायुतीत कोणाला कशा मिळणार जागा; अजित पवारांनी सांगितला तोडगा

Subscribe

आगामी लोकसभा निडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही आहे. कधीही लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थित जागावाटप लवकरात लवकर करण्यावर तिन्ही पक्षांच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत.

आगामी लोकसभा निडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाही आहे. कधीही लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थित जागावाटप लवकरात लवकर करण्यावर तिन्ही पक्षांच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागावाटपाबाबत वक्तव्य करत कशाप्रकारे तोडगा काढला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली. (Loksabha 2024 maharashtra dcm ajit pawar talks on seats sharing)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबतचा तिढा कशाप्रकारे सोडवला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली. “आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटपासंदर्भातील प्राथमिक चर्चा केली. त्या चर्चेत विद्यमान जागा ज्यांच्या आहेत, त्यांना सोडण्याची चर्चा झाली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल. साधारण प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल, अशा पद्धतीने तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

याशिवाय, “आम्हालाही लवकरात लवकर जागावाटप जाहीर करणे गरजेचे आहे. कारण 14 किंवा 15 मार्च रोजी राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी फॉर्म कधी भरायचे? फॉर्म कधी मागे घ्यायचे? फॉर्मची छाननी कधी होईल? हे स्पष्ट होईल”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांकडून यशवंतराव चव्हाणांना अभिवादन

“दरवर्षी आपण 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेतेमंडळी याठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यानुसार मी आज सरकारतर्फे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहे. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, कसा सांभाळायचा आणि त्याचपद्धतीने कसे काम करायचे हे मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान असतानाही त्यांनी दाखवून दिलं. अनेक महत्त्वाची पद त्यांनी भूषवली. त्यानुसार आम्हीही आता काम करत आहोत”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : विजय शिवतारेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची महायुतीच्या नेत्यांना समज; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -