घरताज्या घडामोडी'ध चा मा' करू नका, अजित पवारांनी पुन्हा माध्यमांना खडसावलं

‘ध चा मा’ करू नका, अजित पवारांनी पुन्हा माध्यमांना खडसावलं

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याची माहिती समोर आली होती. परंतु यावर अजित पवारांनी माध्यमांना खडसावत त्यावर स्पष्टीकरण दिलं.

माझ्या ट्विटमधून उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर मी ते काढलं. बाकीचं आहे तसंच आहे. परंतु त्याच्यातून काही लोकं गैरसमज करून घेतात. आता ट्विटरवर सारखा झेंडा लावून फिरू का?, ट्विटरमधील बदल हा दीड वर्षांपूर्वीचाच होता. तुम्ही ‘ध चा मा’ करू नका. कारण जे काही झालं असेल ते मी सांगेन, दुसऱ्या कुणाची आणि ज्योतिषाचीही गरज नाही. तसेच दुसरीकडून बातम्याही काढण्याची गरज नाही.

- Advertisement -

आमच्या मनामध्ये असं काहीही नाही. कुठल्याही प्रकारच्या चर्चा नाहीत. आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम सुरू आहे. माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणीही नाही. इतर पक्षाचे प्रवक्ते माझ्याबद्दल भूमिका मांडतात जणू काही ते राष्ट्रवादी पक्षातलेच आहेत. त्यांना कुणी अधिकार दिला काय माहिती?, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होईल तेव्हा मी विचारणार आहे.

माझ्याबद्दल आणि माझ्या सहकार्यांबाबत जे काही जाणीवपूर्वक बोलले जात आहे, त्यात काहीही तथ्य नाही, असा खुलासा  अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

चौथ्या स्तंभाने जबाबदारीचे भान ठेवावे…, लागोपाठच्या तीन घटनांमुळे अजित पवार उद्विग्न

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अजित पवारांनी दोन दिवसांसाठी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निकटवर्तीयांसह पोलिसांनाही नव्हती. ते यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकींपूर्वी असेच अज्ञातवासात गेल्याने त्यांच्या शुक्रवारच्या कृतीची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, पवार हे नॉट रिचेबल का होते?, यामागील सविस्तर माहिती अजित पवारांनी प्रसार माध्यमांना दिली. परंतु चौथ्या स्तंभाने जबाबदारीचे भान ठेवावे, असं म्हणत अजित पवारांनी प्रसार माध्यमांना सुनावलं होतं.

माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवण्याची सूचना माध्यमांना दिली होती.


हेही वाचा : जे काही चाललंय त्यात काही तथ्य नाही; अखेर अजित पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -