घरमहाराष्ट्रAjit Pawar Vs Awhad : एसटी आणि ट्रेनने फिरतात काय? आव्हाडांचा अजित...

Ajit Pawar Vs Awhad : एसटी आणि ट्रेनने फिरतात काय? आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार काल, रविवारी बारामतीदौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आपण केलेल्या कामांची जंत्री वाचतानाच, मी दिलेल्या उमेदवारालाच जिंकून देण्याचे आवाहन केले. राजकारणाव्यतिरिक्ति माझ्याकडे भरपूर उद्योग असल्याचे सांगताना अजित पवार यांनी एक टिप्पणी केली. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : गणपत गायकवाड प्रकरणावरून राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप, सोमय्यांनाही सुनावले

- Advertisement -

गेल्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे निष्ठावान समजले जाणारे, राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सातत्याने अजित पवार यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

- Advertisement -

अजित पवार यांनी रविवारी बारामतीत झालेल्या सभेत शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा टीका केली. काही तुमच्याकडे येतील आणि ही शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करतील… कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत! असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी हद्द ओलांडली. आपली उंची ओळखा. कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची, आधी पण वाटतच होती, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली होती.

हेही वाचा – Ulhasnagar firing : गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे, ठाकरे गटाचा घणाघात

याच सभेत अजित पवार यांनी, बारामतीतील विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले होते. अन्यथा आपल्याला अनेक उद्योग आहेत. तिथे सकाळपासून एवढे काम केले तर, मी विमान आणि हेलिकॉप्टर घेऊन फिरेन, असे अजित पवार म्हणाले होते. त्याबाबतही जितेंद्र आव्हाड यांनी आज, सोमवारी ट्वीट करत अजित पवार यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. अजित पवार म्हणतात की, एवढा वेळ मी माझ्या धंद्यासाठी दिला तर विमानाने आणि हेलिकॉप्टरमधून फिरेन. सध्या ते एसटी बसने आणि आणि ट्रेनने फिरतात काय? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : “सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जाते”, छगन भुजबळांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -