घरमहाराष्ट्रपैशाचे सोंग आणता येत नाही

पैशाचे सोंग आणता येत नाही

Subscribe

अजित पवार यांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकर्‍याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्वोतपरी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकर्‍यांना मदत मिळावी ही सर्वांचीच मागणी होती.सरकारमध्ये बाहेर असताना सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे हे माहित नसते. पण, तुम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर…, सगळी सोंग करता येतात, पण व्यवहारात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले की, राज्य चालवत असताना, राज्यामध्ये जो अधिकारी वर्ग आहे, त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट, एससीएसटी वर्गाला दिलेला निधी, ओबीसी आणि इतर वर्गाच्या विकासासाठी दिलेला निधी, विकासाच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नाही, या सगळ्याचा साधक बाधक विचार करुन कितपर्यंत आपण कर्ज उचलू शकतो. आपलं उत्पन्न किती आहे, आपली मर्यादा किती शिल्लक आहे, केंद्र सरकार आपल्याला काही मदत करतंय का? या सगळ्यांचा विचार करायचा असतो. मी अर्थमंत्री म्हणून काम केलेले आहे.

आज अर्थ व नियोजन खाते जयंतराव अन् भुजबळांकडे आहे, या सगळ्याचा साकल्ल्याने विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. त्या खात्याचे प्रमुखही वस्तुस्थिती आणि आव्हान लक्षात घेऊन, चर्चा करतात. त्यानंतर मार्ग काढतात. महाविकास आघाडीची तशी मानसिकता झाली असून लवकरच तसे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठे जाणकार आणि प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे, ते योग्यपणे आपली भूमिका घेतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -