घरताज्या घडामोडीधरताही येत नाही अन सोडताही येत नाही अशी माझी अवस्था, कार्यक्रमातील गर्दीवर...

धरताही येत नाही अन सोडताही येत नाही अशी माझी अवस्था, कार्यक्रमातील गर्दीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

कार्यक्रमाला येताना विचार आला की तसच निघून जावावं परंतु कार्यकर्ते नाराज झाले असते आणि लोकांमध्ये नाराजी दिसली असती

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. कोरोनाचं सकट असूनही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी केल्यामुळे विरोधकांनी टीका केली आहे. यावर कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी माझी अवस्था झाली आहे. कार्यक्रमाला न येण्याचा विचार आला होता परंतु आलो नसतो तर कार्यकर्ते आणि लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली असती. कार्यक्रम सकाळी ७ ला घेतला असता तर जास्त गर्दी नसती झाली आणि कार्यक्रमही सुरळीत पार पडला असता असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला भेट द्या अशी मागणी केली होती. राज्यातील एकंदरीत वातावरण पाहता कार्यक्रमाला किती लोकांची उपस्थिती याबाबत विचार केला असता. सकाळी सकाळी उद्घाटन करण्याचा विचार केला होता. या कार्यक्रमाला येताना विचार आला की तसच निघून जावावं परंतु कार्यकर्ते नाराज झाले असते आणि लोकांमध्ये नाराजी दिसली असती यामुळे सांगितले होते की, अतिशय साधेपणाने आणि नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्या प्रमाणे लोकांना सांगतो की गर्दी करु नका नियमांचे पालन करा परंतु आपल्याला ज्या कार्यक्रमाला बोलवले जाते आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की, धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी अवस्था झाली असल्याचे अजितदादांनी म्हटलं असून दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनात अजित पवार यांनी संवाद साधला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. प्रत्येकाने आपल्या परिने या कार्यालयासाठी आर्थिक आणि योगदानाची मदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिली ३ वर्ष सोडली १९९९ मध्ये शिवाजी पार्कमध्ये पवार साहेब, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या उभारणीला उपस्थिती दाखवली त्यांच्यामुळेच हे कार्यक्रम झाले.

पहिले तीन वर्ष लहान जागेत राष्ट्रवादीचे कार्यालय सुरु केलं होत परंतु २००३ पासून आजपर्यंत १८ वर्षे गिरे कुटुंबीयांनी त्यांचा बंगला राष्ट्रवादीला कार्यालय म्हणून वापरायला दिला होता. या सगळ्यांचे कौतुक आणि धन्यवाद अजित पवार यांनी केल आहे. या गिरे कुटुंबीयांनी गेले १८ वर्षे जागेचं भाडंही घेतलं नाही आणि वीज बिलही स्वतःच्या खिशातून भरले असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अजित पवारांच्या कार्यक्रमात तोबा गर्दी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लोकांना गर्दी करु नका असे सांगतात परंतु त्यांच्याच कार्यक्रमाला गर्दी झाल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला होता. अजित पवार यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु आता या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर आणि कार्यक्रमावर राज्य सरकार कारवाई करणार का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -