घरताज्या घडामोडीMaharashtra Corona: वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे महापालिकेच्या बैठका आता ऑनलाईन

Maharashtra Corona: वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे महापालिकेच्या बैठका आता ऑनलाईन

Subscribe

मुंबई तसेच राज्याच्या इतर काही भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध निर्बंध वाढवायला सुरुवात केली आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या महासभा, स्थायी समिती आणि इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत.

मुंबई तसेच राज्याच्या इतर काही भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध निर्बंध वाढवायला सुरुवात केली आहे. मुंबईत पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या आता ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत.

- Advertisement -

माणसांचे मोठ्या प्रमाणावरील एकत्रिकरण टाळण्यासाठी इतरही निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यानुसार महानगरपालिकांच्या सर्व सभा बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. एका महिन्यानंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत १२, हजार १६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६८ जण ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५७८वर पोहोचली आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ लाख १२ हजार २८ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५५३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५२ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंंबईच्या धर्तीवर नाशिककरांना जिल्हाधिकार्‍यांनी दिला अलर्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -