घरमहाराष्ट्रAmbadas Danve : मुख्यमंत्र्यांचे गुंडासोबत फोटो, सत्ताधारी आमदाराचा गोळीबारावरून दानवेंची सरकारवर टीका

Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांचे गुंडासोबत फोटो, सत्ताधारी आमदाराचा गोळीबारावरून दानवेंची सरकारवर टीका

Subscribe

मनोज जरांगेंच्या कॉल रिकॉर्डिंग चेक करा आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी आता कुठे कुठे जात आहे आणि कोणाला भेट आहेत. यांची देखील चौकशी होऊ देत एसआयटीची कार्य कक्षा थोडी मोठी करा, अशी मागणीही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंडाचे फोटो समोर येत आहे. सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. यामुळे राज्याची या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवेंनी 289 अनव्ये प्रस्ताव मांडत कायदा व सुव्यस्थेच्या गंभीर प्रश्नांबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.

अंबादास दानवे म्हणाले, “मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर काही गुंड त्यांच्यासोबत फोटो काढतात. पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर सत्ताधारी आमदार त्याला हिंदू डॉनची पदवी देतात. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला जातो. गोळीबार झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या शहरप्रमुखाचे स्वागत केले जाते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली जाते. या सर्व घटना पाहता राज्यात सामान्य माणूस सुरक्षित नसून गुंड सुरक्षित असल्याची भावना जनमानसात आहे, असे अंबादास दानवेंनी सभागृहात म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : “जरांगेंचे फोन कॉल्स, त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करा”, अंबादास दानवेंची मागणी

 फडणवीसांवर जरांगेंनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली. त्याचबरोब मनोज जरांगेंच्या कॉल रिकॉर्डिंग चेक करा आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी आता कुठे कुठे जात आहे आणि कोणाला भेट आहेत. यांची देखील चौकशी होऊ देत एसआयटीची कार्य कक्षा थोडी मोठी करा. हे सरकार मनोज जरांगेचे आंदोलन दडपण्याचे काम करते.”

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : “मी तुमच्या एसआयटीला घाबरत नाही”, मनोज जरांगेंची दर्पोक्ती

जरांगेंना अटक करावे – दरेकर

मनोज जरांगेंनी फडणवीसांवर बोलताना शिवराळ भाषा वापरत असतील तर, मनोज जरांगेंची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. मनोज जरांगेच्या आंदोलानावर विधानपरिषदेतही एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -