घरदेश-विदेशगणेशोत्सवाच्या धामधुमीत अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन

गणेशोत्सवाच्या धामधुमीत अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन

Subscribe

मुंबई – राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या धामधुमीत ते मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी ते नेहमीप्रमाणे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. मुंबई पालिकेसह इतर पालिकांच्या निवडणुकींच्या तोंडावर अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या राजकीय भाष्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २०१७ पासून नियमित लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र, कोविडच्या काळात ते मुंबई दौऱ्यावर दर्शनासाठी येऊ शकले नाहीत. दरम्यान, आता निवडणुकीच्या तोंडावर ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा निश्चितच राजकीय दौरा ठरणार आहे. या दौऱ्यात अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर, ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत.

- Advertisement -

या वर्षाच्या अखेरीस राज्यात पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपानेही निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, अमित शहांचा दौरा झाल्यानंतर डिसेंबरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर यण्याची शक्यता आहे. १५ आणि १६ डिसेंबरला ते मुंबई दौऱ्यावर येतील.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -