घरताज्या घडामोडी...तेव्हा आम्ही शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढण्यासाठी प्रयोग केलेला -...

…तेव्हा आम्ही शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढण्यासाठी प्रयोग केलेला – अमोल मिटकरी

Subscribe

आज दिवसभरात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या काही आमदारांसह भाजपात जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या. राज्यभरातील राजकीय नेत्यांकडूनही अजित पवारांच्या भाजपात जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया येत होत्या. परंतु, अजित पवार यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना या सर्व अफवा असल्याचे सांगितले. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रावादीसोबत राहणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले.

आज दिवसभरात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या काही आमदारांसह भाजपात जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या. राज्यभरातील राजकीय नेत्यांकडूनही अजित पवारांच्या भाजपात जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया येत होत्या. परंतु, अजित पवार यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना या सर्व अफवा असल्याचे सांगितले. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रावादीसोबत राहणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अजित पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी “मी एकच सांगू इच्छितो की, जसे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेतला होता, तोच धागा धरून सांगतोय की, शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढायला, आमचा हा प्रयोग होता, असं समजण्यास काहीही हरकत नाही” असे विधान केले.

‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमोल मिटकरी यांनी दिवसभरात पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर भाष्य केले. तसेच, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “शिंदे गटाचे आमदार हे दुतोंडी साप आहेत. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून आम्ही भाजपाबरोबर गेलो, असे त्यांनी म्हटले होते. यामध्ये शहाजीबापू पाटील, संजय शिरसाट, संतोष बांगर हेच लोक होते. उद्धव ठाकरे जेव्हा आमच्याबरोबर आले, तेव्हाही याच लोकांनी तोंडसुख घेतले होते”, असे अमोल मिटकरी म्हणाले. (Amol Mitkari Ajit Pawar Rumours About Joining Bjp Sharad Pawar NCP)

- Advertisement -

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, असे ते म्हणाले होते. पण आता त्यांची थोबाडं का बंद झालीत? आता अजित पवार त्यांच्याकडे जातायत, तर त्यांना गुदगुल्या झाल्या. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका शिंदे गटाविरोधात होती किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीबरोबर आले. तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांना आग लागली होती. त्यामुळे हे दुतोंडी सापासारखे आहेत. या वाचाळवीरांकडे आता कुणाचंही लक्ष राहिलं नाही. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात यांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. यांना जनता जागा दाखवेल. अजित पवारांवर तोंडसुख घेणाऱ्यांचे थोडेच दिवस उरले आहेत”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

“मी एकच सांगू इच्छितो की, जसे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेतला होता, तोच धागा धरून सांगतोय की, शिंदे गटातील गद्दारांच्या मनातील मळमळ बाहेर काढायला, आमचा हा प्रयोग होता, असं समजण्यास काहीही हरकत नाही”, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आजच्या बातम्या या अफवा, वायफळ चर्चांवर आधारित, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -