घरमहाराष्ट्ररायगडमधील अंगणवाड्यांना नवीन इमारती मिळणार

रायगडमधील अंगणवाड्यांना नवीन इमारती मिळणार

Subscribe

५६ इमारतींसाठी ४ कोटी ८० लाख निधी

रायगड जिल्ह्यातील भाड्याच्या घरात सुरू असलेल्या 420 अंगणवाड्यांपैकी 250 अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यासाठी राज्य शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यापैकी 94 नवीन इमारतींचे बांधकाम सुरू होणार असून, नवीन 56 इमारतींसाठीचा 4 कोटी 80 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केला, तर 38 अंगणवाड्यांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे .

जिल्ह्यातील 2 हजार 679 अंगणवाड्यांपैकी तब्बल 420 अंगणवाड्या आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरत आहेत. महाड तालुक्यात सर्वाधिक 59 अंगणवाड्या भाड्यांच्या खोल्यांमध्ये भरत आहेत. त्या खालोखाल माणगाव 53, पेण 50, पोलादपूर 27, पनवेल 26, म्हसळे 25, कर्जत 17, सुधागड 18, उरण आणि तळे प्रत्येकी 10, अलिबाग 8, रोहे 9, श्रीवर्धन तालुक्यात 2 अंगणवाड्यांचा समावेश आहे. यापैकी अनेक ठिकाणी पाण्याची, शौचालयांची सुविधा नाही. तसेच स्वच्छतेचाही अभाव आहे. त्यामुळे शिक्षण घेणार्‍या बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर आहे. भाड्यासाठी प्रत्येक खोलीला दरमहा 200 रुपये द्यावे लागत असल्याने सरकारला दरमहा 61 हजार 200, तर दरवर्षी 7 लाख 34 हजार 400 रुपये भाडे द्यावे लागते.

- Advertisement -

जिल्ह्यात 94 अंगणवाड्यांच्या नवीन इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेने 56 अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 56 इमारतींसाठी प्रत्येकी 8 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे 4 कोटी 80 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित 38 अंगणवाडी बांधकामासाठीचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना लवकरच मंजुरी मिळून निधी वर्ग केला जाईल.
-सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -