घरमहाराष्ट्र'अँटिलिया प्रकरणाला १५० दिवस उलटले, ९० दिवसांची मर्यादा असताना NIA कडून आरोपपत्र...

‘अँटिलिया प्रकरणाला १५० दिवस उलटले, ९० दिवसांची मर्यादा असताना NIA कडून आरोपपत्र दाखल का नाही?’

Subscribe

महाराष्ट्र काँग्रेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचा प्रश्न

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवलेल्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. (Antilia bomb scare) तपास सुरु करुन आता १५ दिवस होऊन गेले आहेत. या प्रकरणी अद्याप एनआयएने आरोपपत्र दाखल केलेलं नाही. यावरुन महाराष्ट्र काँग्रेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

एनआयएने दोन दिवसांपूर्वी न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिकचा अवधी मागितला. यानंतर न्यायालयाने एनआयएला ३० दिवसांचा अवधी दिला आहे. यावरुन सचिन सावंत यांनी अँटिलिया प्रकरणाला १५० दिवस उलटले, ९० दिवसांची मर्यादा असताना NIA कडून आरोपपत्र दाखल का नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

“अँटिलिया घटनेचा तपास एनआयएने सुरू करुन १५० दिवस होऊन गेले. आरोप पत्रासाठी एनआयएला अजून ३० दिवस दिले गेले. खरंतर केवळ ९० दिवसांची मर्यादा आहे
१. एनआयए सतत वेळ वाढवून का मागते?
२. मास्टरमाईंड कधी पकडणार?
३. एनआयए स्फोटक भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाजवळ ठेवण्याचा खरा हेतू कधी सांगेल?”

असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबई येथील घराबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक कार सापडली होती. त्यानंतर ज्यांच्या ताब्यात ही कार होती त्या मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. ५ मार्चला हिरेन यांचा थेट मृतदेहच आढळून आला. या दोन्ही प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -