घरमहाराष्ट्रउद्विग्न शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

उद्विग्न शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने तसेच राज्यात शिवसेनेचे सरकार न आल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्याने दिग्रस येथे कामानिमित्त आलेल्या एका शिवसैनिकाने उद्विग्न होत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घटना घडल्याचे समोर आले आहे. स्वतःवर ब्लेडचे वार करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर व्यक्ती स्वतःला शिवसैनिक असल्याचे सांगत असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने तसेच राज्यात शिवसेनेचे सरकार न आल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बाळू जाधव वय ४५ , हा वाशीम जिल्ह्यातील उमरी खुर्द ता. मानोरा येथील रहिवाशी आहे. तो काही कामानिमित्त दिग्रस येथे आला होता. येथे राज्यात शिवसेने ऐवजी भाजपाचे सरकार स्थापन झाल्याची बातमी त्याला कळाली. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्याने तात्काळ दिग्रस मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करण्यास सुरवात केली.

- Advertisement -

वाहतुक हवालदाराने वाचवले प्राण

तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतुक हवालदार युवराज चव्हाण यांनी तात्काळ त्यांच्या डिबी पथकाच्या मदतीने सदर व्यक्तीस ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या व्यक्ती जवळील धारदार ब्लेड जप्त करण्यात आल्याचे डी बी पथकाचे नितीन वास्टर यांनी सांगितले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद राज्यातील सामान्य जनतेत उमटत आहेत. दिग्रसमध्ये घडलेल्या या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र काही काळातच संबंधितावर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -