घरमहाराष्ट्रप्रशांत हिरे, अपूर्व हिरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रशांत हिरे, अपूर्व हिरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

भाजपला मोठा धक्का मानली जात असलेली घटना शुक्रवारी सकाळी घडली असून प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नाशिकमधले आमदार छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपला मोठा धक्का मानली जात असलेली घटना शुक्रवारी सकाळी घडली असून प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नाशिकमधले आमदार छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाशिकमध्ये हिरेंचं मोठं प्रस्थ मानलं जात असून नाशिकच्या कसमादि पट्ट्यामध्ये या हिरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत: प्रशात हिरेंच्या रुपाने मोठं नुकसान होण्याची शक्यता असून कसमादि पट्ट्यामध्ये अपूर्व हिरे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला आमदारकीसाठी तगडा उमेदवार मिळाला आहे.

कोण आहेत हिरे?

शिक्षण संस्था आणि इतर माध्यमातून हिरे कुटुंबियांनी स्वत:चं एक वेगळं प्रस्थ नाशिकमध्ये निर्माण केलं आहे. विशेषत: कळवण, सटाणा, मालेगाव, दिंडोशी या कसमादि पट्ट्यामध्ये अपूर्व हिरे आणि प्रशांत हिरे यांची ओळख आहे. मात्र, यंदा भाजपकडून सीमा हिरेंनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्ह दिसत असल्यामुळे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग पत्करला आहे. प्रशांत हिरे हे तसं पाहाता गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. मात्र, आज ही चर्चा खरी ठरल्याचं पाहायला मिळालं. अपूर्व हिरेंसोबत प्रशांत हिरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील बडे प्रस्थ असलेले आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. हिरे कुटुंबियांना राष्ट्रवादीच्या गळाला लावण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. या दोघांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे नाशिमधलं स्थानिक राजकारण नवं वळण घेण्याची शक्यता आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – राष्ट्रवादी ,शिवसेना सह काँग्रेस मधील २४ नगरसेवक संपर्कात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -