घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात तब्बल 3 लाख महिला वाहनचालक

नाशिक शहरात तब्बल 3 लाख महिला वाहनचालक

Subscribe

नाशिक : शहरातील तब्बल तीन लाख महिलांनी दुचाकीसह चारचाकी वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून आतापर्यंत 2 लाख 92 हजार महिलांनी वाहन चालवण्याचा परवाना घेतला आहे. वर्षागणिक हा आकडा वाढत असल्याने महिला वाहनचालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होते.

झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिक शहरात वाहनांची संख्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ कार्यालयात या वाहनांची नोंदणी होते. तसेच, वाहन चालवण्याचा परवाना याच कार्यालयाकडून दिला जातो. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होतो. विनागिअर दुचाकी (मोपेड) गाडी आल्यापासून महिलांचे गाडी चालवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. परंतु, फक्त दुचाकीपर्यंत मर्यादित न राहता, चारचाकी, रिक्षा, स्कूल व्हॅनसारखी वाहने चालवून उदरनिर्वाह करणार्‍या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. नाशिक शहरातील दोन लाख 92 हजार 212 महिलांनी आतापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळवला आहे. शहराची लोकसंख्या साधारणत: 20 लाख आहे. यात महिला परवानाधारकांची संख्या विचारात घेतली तर हे प्रमाण सद्यस्थितीला पुरुषांच्या तुलनेत कमी दिसत असले तरी दिवसेंदिवस त्यांचा आकडा वाढत असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

- Advertisement -

लायसन्ससाठी ऑनलाईन नोंदणी यांना वाहन चालवण्याचा परवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर एक दिवस आरटीओ कार्यालयात ट्रायल घेतली जाते व त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर लायसन्स त्याच्या मूळ पत्त्यावर पाठवले जाते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ वाटत असल्याने बहुतांश लोक ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून हे परवाने मिळवतात.

..म्हणून महिला चालकांचे वाढले प्रमाण

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना चारचाकी वाहन चालवण्यासाठी त्यांना नेहमी चालक किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागते. हे परावलंबत्व कमी करण्यासाठी महिला ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून स्वत: ड्रायव्हिंग शिकतात. विशेषत: उन्हाळी सुटीत ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेशित महिलांचे प्रमाण सर्वाधिक असते. अगदी सहजरित्या ते गाडी शिकवत असल्यामुळे नाशिकमधील महिला चालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -