घरमहाराष्ट्र...तर अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - संजय राऊत

…तर अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी – संजय राऊत

Subscribe

ही बाब प्रशासन आणि सरकारच्या संघर्षाची नाही.

महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरु आहे, अशा चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर जुनी खाट अधूनमधून कुरकुरते असा उपहासात्मक टोला काँग्रेसला लगावला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेसच्या काही नेत्यांची मुलाखती मी वाचल्या आहेत. खासकरून अशोक चव्हाण यांची. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. ही गोष्ट प्रशासन आणि सरकारच्या संघर्षाची नाही. शिवाय महाराष्ट्रात कोरोना आणि चक्रीवादळाचं मोठं संकट आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे, तर भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा…; आव्हाडांनी विरोधकांना सुनावले


सामनाच्या अग्रलेखावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही बदल्यांसाठी आग्रही नाही आहोत. तर राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत, अशी आमची अपेक्षा आहे. खाटेची कुरकुर ऐकून घ्यावी. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमची भूमीका मांडू. काँग्रेस भक्कमपणे आघाडी सोबत आहे. सामनाने अपूर्ण माहिती घेऊन अग्रलेख लिहिला आहे. आजच्या अग्रलेखातून काँग्रेसबद्दलची चूकिची माहिती गेली आहे आमचं म्हणणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री समाधानी होतील. आमची भेट झाल्यानंतर सामनाने अग्रलेख पुन्हा लिहावा,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -