घरमहाराष्ट्रअशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लीपने खळबळ

अशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लीपने खळबळ

Subscribe

संभाषण वैयक्तिक असल्याचा केला दावा

काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते आणि त्यांचे पुत्रांनी राजीनामा दिला असताना शनिवारी अशोक चव्हाणांच्या ऑडिओ क्लीपने राजकीय वर्तुळात खळबळ उडविली. आपणच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये समोर आल्याने सगळ्यांच्या भुवया उंचविल्या आहेत.

मुळात चंद्रपुराच्या एका कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही नाराजी बोलून दाखविली असून आपले पक्षात कोणीही ऐकत नाहीत, असेही यात त्यांनी म्हंटले आहे.मात्र अशोक चव्हाण यांनी आपण ही क्लिप ऐकली नसल्याचे म्हटले असून ही किल्प वैयिक्तक संभाषण असल्याचा दावा त्यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी हा दावा जरी फेटाळला असला तरी शनिवारी दिवसभर राजकीय क्षेत्रात त्यांच्या राजीनाम्याचीच चर्चा रंगत होती.

- Advertisement -

चंद्रपुरात विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आता अशोक चव्हाण नाराज आहेत का? त्या क्लिपमध्ये त्यांचा आवाज आहे का? हे स्पष्ट व्हायचं आहे. तूर्तास तरी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हे माझे काम असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळे अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, याप्रकरणी बोलताना अशोक चव्हाण यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे सगळे अंतर्गत विषय आहेत, चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे हे माझे काम आहे. मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -