घरमहाराष्ट्रयुतीच्या तिढ्यात नाणार!

युतीच्या तिढ्यात नाणार!

Subscribe

युतीच्या भवितव्यावर आता नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीची चर्चा जरी अंतिम टप्प्यात आली असली तरीदेखील आता युतीच्या भवितव्यावर नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे युतीची बोलणी होत असतील तर त्यामध्ये प्रामुख्याने नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल काढलेला अध्यादेश रद्द करायला लावू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आज नाणार रिफायनरी संघर्ष समितीला दिला आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी ग्रामस्थांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी वालम आणि ग्रामस्थांनी ‘सध्या युतीची चर्चा सुरू आहे. युतीचा निर्णय जाहीर होईपर्यंत अध्यादेश रद्द करून घ्या’, अशी मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची बोलणी होत असतील तर आद्यदेश रद्द करायला भाग पाडू’, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याचे वालम म्हणाले. त्यामुळे आता युतीच्या भवितव्यावर नाणार वासीयांचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, यावेळी ग्रामस्थासह शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपस्थित होते.

…म्हणून वालम ग्रामस्थांसह मातोश्रीवर

सध्या भाजप-शिवसेना युतीची बोलणी सुरू असल्याने याचा फायदा घेत या चर्चेमध्ये शिवसेनेने भाजपासमोर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अद्यादेश रद्द करण्याची मागणी करावी, ज्याचा फायदा शिवसेनेलाही होऊ शकतो आणि नाणारच्या ग्रामस्थांनाही होऊ शकतो हे सांगण्यासाठी आणि नाणार प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी वालम यांनी ग्रामस्थासह उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबद्दल उद्धव ठाकरे यांना माहिती अद्यादेश रद्द करून घेण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी अद्यादेश रद्द करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ‘आम्ही सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत’, असे वालम यांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -

युती पेक्षा नानारवासीय महत्वाचे

दरम्यान याबद्दल शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारले असता त्यांनी युतीपेक्षा रिफायनरी रद्द करण्यात मला रस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे सांगितले. तसेच ‘नाणार रद्द झालाच पाहिजे’ ही शिवसेनेची कायम भूमिका असल्याचे सांगत ‘आम्ही नाणार कदापी होऊ देणार नाही’, अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि आज मांडल्याचे सांगितले.

राणेंसोबत असलेले वालम आज मातोश्रीवर

दरम्यान, वर्षभरापूर्वी नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची साथ सोडून राणेंचा सल्ला घेणारे अशोक वालम यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या समोरच विनायक राऊत आणि वालम यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर नारायण राणे निलेश राणे, नितेश राणे यांच्यासोबत व्यासपीठावर वालम दिसले होते. याबद्दल वालम यांना विचारले असता ‘आम्ही सर्वच राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळवला. जर सर्व पाठींबा मिळवला नसता तर आमच्या जमिनी गुजराती आणि मारवाडी लोकांच्या घशात दलालांनी घातल्या असत्या’, असे सांगत अधिकचे बोलणे टाळले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणीत ‘नाणारचा मुद्दा प्रामुख्याने घेऊ आणि अद्यादेश रद्द करू’, असे आश्वासन दिले आहे. आद्यदेश रद्द करणं आता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे युतीच्या बोलणीत हा मुद्दा घ्यावा, असे आम्ही त्यांना सांगितले.
– अशोक वालम, अध्यक्ष, नाणार रिफायनरी संघर्ष समिती
- Advertisement -

 

युती पेक्षा विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द होणे शिवसेनेसाठी महत्वाचे आहे. आज उद्धव ठाकरे यांनी नाणारचा अद्यादेश रद्द करू, असे सांगितले आहे.
– विनायक राऊत, खासदार शिवसेना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -