घरमहाराष्ट्रकाठावर पास तरीही विजय झकास

काठावर पास तरीही विजय झकास

Subscribe

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. २८८ मतदार संघात अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यातही काहींनी कडवी झुंज देत मताधिक्य मिळवले आणि विजय संपादन केले. असेच काही नशीबवान उमेदवार सर्वात कमी मताधिक्याने निवडून आले असून अत्यंत कमी मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. ज्यात प्रामुख्याने चांदीवली मतदार संघातील शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या माजी मंत्री नसीम खान यांना केवळ ४०९ मतांनी पराभूत केले. नसीम खान गेल्या निवडणुकीत २९ हजार ४६९ मतांनी विजयी झाले होते.

मुंबईसह राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालानंतर सर्वात कमी मताधिक्यांनी मुंबईतील चांदिवली येथील ४०९ मतांनी शिवसेनेचे दिलीप लांडे निवडून आले आहेत.त्याचप्रमाणे मोरगाव विधानसभा मतदार संघाचे मनोहर चंद्रीकापुरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या राजकुमार बडोले यांचा केवळ ७१८ मतांनी पराभव केला. राजकुमार बडोले यांचा गेल्या निवडणुकीत ३०२९५ मतांनी विजय झाला होता.तर पश्चिम महाराष्ट्रातील दौंड हा मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा ७४६ मतांनी विजय झाला. गेल्या निवडणुकीत राहुल कूल राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढताना ११३४ मतांनी विजयी झाले होते.

- Advertisement -

सांगोल्यात शिवसेनेचे शाहजीबापू पाटील यांनी शेकापच्या अनिकेत चंद्रकांत देशमुख यांच्या केवळ ७६८ मतांनी पराभव केला. अनिकेत पाटील हे माजी आमदार गणपतराव पाटील यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख यांचा गेल्या निवडणुकीत २५२२४ मतांनी विजय झाला होता. कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा केवळ ८२२ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा २९ हजार २७० मतांनी विजय झाला होता. भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा १३१४ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत रुपेश म्हात्रे यांचा ३३९३ मतांनी विजय झाला होता.मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हरिश पिंपळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांचा १९१० मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये त्यांनी १२८८८ मतांनी विजय मिळवला होता.

मुक्ताईनगर मतदार संघात अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा १९५७ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत या मतदार संघातून एकनाथ खडसे ९७०८ मतांनी विजयी झाले होते.बीडमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर याने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढताना भाजपच्या आपले काका जयदत्त क्षीरसागर यांचा केवळ १९८४ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीकडून लढताना ६१३२ मतांनी विजयी झाले होते.सिन्नर मतदार संघातून माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढताना शिवसेनेच्या पराग वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत पराग वाजे यांचा २० हजार ५५४ मतांनी विजय झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -