घरमहाराष्ट्रकबड्डी स्पर्धेदरम्यान आख्खी प्रेक्षक गॅलरी कोसळली, ६० जखमी

कबड्डी स्पर्धेदरम्यान आख्खी प्रेक्षक गॅलरी कोसळली, ६० जखमी

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धे दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कबड्डीचा अंतिम सामना सुरू असतानाच मैदानातील लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली. या घटनेमध्ये ६० जण जखमी झालेत. जखमींना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.

राजुरातील पंचायत समितीजवळील पशु वैद्यकीय रुग्णालयात ३ दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामना सुरू असतानाच अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये धावपळ सुरू झाली. यात अनेक जण जखमी झाले. हा कबड्डीचा अंतिम सामना बघायला राजुरा विधानसभेचे भाजपा आमदार संजय धोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी शेखर देशमुख व पोलीस निरीक्षक कोकाटे हेही उपस्थित होते.

- Advertisement -

पाहा व्हिडिओ

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1986427554780789&id=1678248008932080

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -