घरमहाराष्ट्र'अरुण जेटली यांच्या निधनामुळे अभ्यासू नेते काळाच्या पडद्याआड'

‘अरुण जेटली यांच्या निधनामुळे अभ्यासू नेते काळाच्या पडद्याआड’

Subscribe

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या अकस्मित निधनाने अभ्यासू राजकारणी, निष्णात कायदेतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अरुण जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना आमदार थोरात म्हणाले की, यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता. अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जेटली कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाेले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे आज एम्सकडूनही जाहीर करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा हे आहेत. अरुण जेटली हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूक मंत्री होते. त्याचबरोबर २००० सालापासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. २००९ साली त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते पदाची भूमिका साकारली. जेटली आपल्या कार्यशैलीमुळे अनेकांचे आदर्श आहेत. त्यांनी ‘मोदी सरकार १’च्या कार्यकाळात सादर केलेले अर्थसंकल्प त्याचेच उदाहरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -