घरमहाराष्ट्रअरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल

अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल

Subscribe

सोमवारपासून पून्हा महाजनादेश यात्रेस सुरूवात

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार २५ ऑगस्ट रोजी स्थगित केली आहे. आज मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटतील पण कोणतीही भाषणं होणार नाहीत किंवा हार स्वीकारले जाणार नाहीत, असे यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.


हेही वाचाः अरुण जेटली यांचं जाणं अत्यंत क्लेशदायक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

”आमचे थोर नेते अरूण जेटली यांची बातमी ऐकून अतिशय वाईट वाटले. मी अतिशय व्यथित आहे, तीव्र दु:खी आहे. अवघ्या एका पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या. अरूण जेटलजी यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.  एक उमदा विद्यार्थी नेता, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम आणि निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे हिरावून घेतले गेले आहे.

प्रकृती प्रतिकूल असतानाही पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करीत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले पाहिले आहे. प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये त्यांना उपस्थित राहताना पाहिले आहे. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधी व न्याय विभागाचे मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. जीएसटीच्या अंमलबजावणीत सुद्धा त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील.”

– देवेंद्र फडणवीस ,मुख्यमंत्री

सोमवारपासून पून्हा महाजनादेश यात्रेस सुरूवात

सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी केवळ लोकांना भेटतील. पण कोठेही स्वागताचे कार्यक्रम होणार नाहीत तसेच हारफुले स्वीकारण्यात येणार नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -