घरताज्या घडामोडीपीओपी गणेश मूर्तीवरील बंदी एक वर्षासाठी मागे!

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी एक वर्षासाठी मागे!

Subscribe

भाजप आमदार अँड. आशिष शेलार यांनी तातडीने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर घातलेली बंदी एक वर्षापुर्ती मागे घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. एकीकडे कोरोनाचे युद्ध सुरू असतानाच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे केंद्र सरकारने यावर्षीपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो गणेश मूर्तिकार अडचणीत आले होते. विशेषत: पेण हे गणपतीचे गाव म्हणून ओळखले जाते या परिसरात हमरापुर, दोहे, दादर, कळवे अशा छोट्या छोट्या गावांमध्ये साडेतीनशेहून अधिक गणेशमूर्ती कारखाने असून एका वर्षात पन्नास लाखाहून अधिक मूर्ती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशात आणि देशाबाहेरही निर्यात होतात.

यावर्षी कोरोनामुळे आधीच हे कारखानदार अडचणीत आले असताना केंद्र सरकारच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीचा निर्णयाने त्यांचे कंबरडे मोडले होते. याबाबत भाजप आमदार अँड. आशिष शेलार यांनी तातडीने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असले तरी यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता केवळ एका वर्षापूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस वरची बंदी मागे घ्यावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही बंदी एक वर्षापूर्ती मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तातडीने आमदार आशिष शेलार यांनी प्रकाश जावडेकर यांचे महाराष्ट्रातील तमाम कारखानदार, मूर्तिकार आणि गणेश भक्तांच्या वतीने आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -