घरमहाराष्ट्रघरगुती उपाय बाळाच्या जीवावर बेतला; श्वसननलिकेतून काढला जिवंत मासा

घरगुती उपाय बाळाच्या जीवावर बेतला; श्वसननलिकेतून काढला जिवंत मासा

Subscribe

बाळ लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडात फिरवून बाळाचा जीव धोक्यात घातला. अखेर बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

बारामतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. साडेचार महिन्याच्या मुलीच्या तोंडातून जन्मल्यापासून लाळ गळते म्हणून तिच्या आईने चक्क बाळाच्या तोंडातून जिवंत मासा फिरवला. मात्र मासा गुळगुळीत असल्याने तो हातातून सटकला आणि बाळाने मासा गिळला. हा मासा बाळाच्या अन्ननलिकेतून श्वसननलिकेपर्यंत गेला. त्यामुळे बाळाला जीव घुसमटायला लागला. तिला रुग्णालयात नेईपर्यंत बाळाचा श्वास बंद झाला. पण बारामतीमधील डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला आहे.

ऊस तोडणीसाठी आले होते बारामतीला 

एका ऊसतोड करणाऱ्या महिलेला दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन केलेला घरगुती उपाय महागात पडला आहे. बारामती तालुक्यात ऊस तोडणीसाठी चाळीसगाव येथून बापू माळी यांचे कुटुंब आले आहे. भिमा पाटस साखर कारखान्याच्या ऊस तोडणीचे काम ते करत असून बारामतीच्या शिर्सूफळमध्ये ते राहतात. बाळू माळी यांना अनु नावाची साडेचार महिन्यांची मुलगी आहे. मात्र जन्मल्यापासून ती तोंडातून लाळ गाळते. बाळू माळी यांच्या पत्नीला कोणी तर सांगितले होते की, ‘जर बाळाच्या तोंडातून जिवंत मासा फिरवला तर लाळ गाळणे बंद होईल.’

- Advertisement -

अशी घडली घटना 

बाळाच्या आईने सांगितल्याप्रमाणे उपचार करायला गेली आणि मोठा खेळ झाला. बाळू यांच्या पत्नीने जिवंत मासा शोधून काढला. हाताच्या बोटाच्या आकाराचा जिवंत मासा तिने आणून अनुच्या तोंडात फिरवण्याचा प्रयत्न केला खरा. पण मासा गुळगुळीत असल्यामुळे तो तिच्या हातातून सटकला आणि अनुने मासा गिळला. गिळलेला मासा अनुच्या अन्ननलिकेतून श्वसननलिकेपर्यंत गेला आणि अनुचा जीव घुसमटायला सुरुवात झाली. त्यानंतर घाबरलेल्या बाळू यांनी शेजारच्यांची गाडी घेऊन थेट बारामतीच्या रुग्णालयात धाव घेतली.

अनुचा जीव वाचवण्यात यश

बारामतीच्या डॉ. मुथा यांच्या श्रीपाल रुग्णालयात अनुला घेऊन जाण्यात आले मात्र तोपर्यंत अनुचा श्वास बंद झाला. डॉक्टरांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी क्रिया केली आणि तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अनुवर दुर्बिंणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली आणि मासा बाहेर काढला. बाहेर काढण्यात आलेला मासा जिवंतचं होता. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरु झाल्यानंतर तिला येणारे झटके कमी करण्यासाठी तिला इंजेक्शन देऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास सोडला. अनुच्या कुटुंबियांना देखील अश्रु अनावर झाले नाही डॉक्टरांचे आभार कसे मानायचे हे त्यांना सुचत नव्हते.

- Advertisement -

बाळावर घरगुती उपचार करताना सावधान 

दरम्यान, अंधश्रध्देला बळी पडून केलेले उपाय कधीही जिवावर बेतू शकतात. त्यामुळे थोडी सावधानता बाळगा. कोणी काय सांगितले आणि ते करुन पाहिले अशामध्ये एखाद्याच्या जीव गमवण्याची वेळ येऊ शकते. अनुच्या बाबतीत हेच घडले. मात्र डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून तिला बाहेर काढले. सर्वांनी बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार या सर्वांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -