घरठाणेBhiwandi Mla : आमदार रईस शेख यांचा राजीनामा

Bhiwandi Mla : आमदार रईस शेख यांचा राजीनामा

Subscribe

ठाणे : भिवंडी येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून रईस शेख यांनी राजीनामा दिल्याची चर्चा भिवंडी परिसरात सुरु आहे. राजीनामा दिल्याचे वृत्त पसरताच शेकडो कार्यकर्ते रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले.
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील, बाळ्या मामा म्हात्रे, निलेश सांबरे हे तीन मोठे उमेदवार रिंगणात आहेत. याच वेळी समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे सोपविला असल्याने शनिवारी सकाळ पासून कोणार्क अर्केड या इमारती खाली रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. विशेष म्हणजे यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा-Narcotics : लोकसभा निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ कारवाई थंड

- Advertisement -

भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलां साठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र असून या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. दरम्यान रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतु शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम व महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे. समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आजमी व रईस शेख यांच्यात भिवंडी शहरात मागील दोन वर्षांपासून पक्षांतर्गत वर्चस्वा वरून वाद असून त्यातूनच हा निर्णय रईस शेख यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातले मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडतो आहे. त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन. मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे. मी उपस्थिती केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेईल असे आमदार रईस शेख यांनी सांगितले

- Advertisement -

हेही वाचा-भिवंडीकर निवडणूक ओळख पत्रापासून वंचित


 

Edited by- Amol Kadam

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -