घरताज्या घडामोडी६६ हजार रुपयांचं बिल थकवलं; संतापलेल्या हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवला

६६ हजार रुपयांचं बिल थकवलं; संतापलेल्या हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवला

Subscribe

सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हॉटेलमध्ये सदाभाऊ खोत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहिले होते. या हॉटेलचे ६६ हजार ४५० रुपये बिलाचे देणे त्यांनी अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला. 

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एका हॉटेलचे ६६ हजार ४५० रुपये दिले नसल्याने हॉटेलमालकाने त्यांचा ताफा अडवला असल्याचं समोर आलं आहे. या हॉटेल मालकाने खोत यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. सदाभाऊ खोत आज पंजायत राज समितीच्या दौऱ्याला निघाले होते. तेव्हा हा प्रकार घडला. (Bill of Rs. 66,000 exhausted; The hotel owner stopped Sadabhau khot’s convoy)

सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हॉटेलमध्ये सदाभाऊ खोत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहिले होते. या हॉटेलचे ६६ हजार ४५० रुपये बिलाचे देणे त्यांनी अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला.

- Advertisement -

हेही वाचा – घट्ट मिठीतून तू का गं निघून गेलीस?, सदाभाऊ खोतांवर दुःखाचा डोंगर

हॉटेल मामा भाचा असे या हॉटेलचं नाव असून मालक अशोक शिनगारे यांनी वारंवार फोन करूनही सदाभाऊ खोतांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी आज अखेर संतापून त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, असं सांगण्यात येतंय.

- Advertisement -

दरम्यान, आपली बदनामी करण्यासाठी राष्ट्रवादीने हा डाव रचला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘मी त्या मालकाला ओळखत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते. पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मी २०१४ पासून १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलं आहे.

हेही वाचा – भाव वाढले म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का; वाढत्या महागाईचे सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन

ते पुढे म्हणाले की, ‘सांगोला तालुक्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावर येण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलं आहे. परंतु अशा पद्धतीने माझा आवाज हा राष्ट्रवादीला दाबता येणार नाही.’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -