घरमहाराष्ट्रकुर्ल्यात दिव्यांग व्यक्तीच्या घरावर दरड कोसळली; अग्निशमन दलाकडून कुटुंबियांची सुखरूप सुटका

कुर्ल्यात दिव्यांग व्यक्तीच्या घरावर दरड कोसळली; अग्निशमन दलाकडून कुटुंबियांची सुखरूप सुटका

Subscribe

या दुर्घटनेत घरात अडकलेले घराचे मालक अशोक व्हटकर व त्यांची आई अशा दोघांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केल्याने ते बचावले; मात्र व्हटकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.

कुर्ला येथील साकिनाका – काजूपाडा येथील संगम सोसायटीमधील एका दिव्यांग व्यक्तीच्या एकमजली घरावर अचानकपणे दरड कोसळली. या दुर्घटनेत घरात अडकलेले घराचे मालक अशोक व्हटकर व त्यांची आई अशा दोघांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केल्याने ते बचावले; मात्र व्हटकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. (In Kurla, sliding wall on the house; Family members rescued by fire brigade)

प्राप्त माहितीनुसार, कुर्ला साकिनाका येथील काजूपाडा भागात राहणारे अशोक व्हटकर हे दिव्यांग आहेत. त्यांचे एकमजली घर हे टेकडीला लागून आहे. त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा साचलेला होता. हा कचरा हटवून स्वच्छता राखण्यासाठी माजी नगरसेवक हरीश भादिंर्गे यांच्याकडे विनंती केली होती, मात्र त्यांनी अपेक्षित लक्ष दिले नाही. त्यातच, गुरुवारी सकाळपासून घाटकोपर, कुर्ला आदी उपनगरातील काही भागात चांगला पाऊस पडला.

- Advertisement -

सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घरावर अचानकपणे दरड कोसळली. त्याचा मोठा आवाज झाला. त्यावेळी मी वरच्या मजल्यावर होतो तर माझी आई, दोन मुले व पत्नी खालच्या घरात होते, असं अशोक व्हटकर यांनी सांगितले.

अशोक व्हटकर दिव्यांग असल्याने व त्यांची आई वृद्ध असल्याने दोघेजण घरात अडकले. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या दरडीचा भाग हटवला व अशोक व त्यांची आई यांची सुटका केली.

- Advertisement -

येथील टेकडीच्या परिसरात २० घरे असून पावसाळ्यात या घरांना दरड कोसळण्याचा व त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -