घरमहाराष्ट्रबीडमधील 'त्या' घटनेप्रकरणी कठोर कारवाई करावी, वडेट्टीवारांची राज्य शासनाकडे मागणी

बीडमधील ‘त्या’ घटनेप्रकरणी कठोर कारवाई करावी, वडेट्टीवारांची राज्य शासनाकडे मागणी

Subscribe

मुंबई : बीडमधील एका विवस्त्र महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून या प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : जातनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका; फडणवीसांनी केले स्पष्ट

- Advertisement -

वाळुंज शिवारातील जमिनीसंदर्भात पीडीत 40 वर्षीय महिलेचा अन्य दोघांबरोबर वाद झाला. पण हा वाद मिटविण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस घटनास्थळी गेल्या होत्या. पण जमिनीचा वाद मिटण्याऐवजी विकोपाला गेला. पीडित महिलेचे कपडे फाडल्याची माहिती समोर येत असून महिला विवस्त्र असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर चार जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन आपण कसत आहोत. पण राहुल आणि रघू हे दोघे माझ्याजवळ आले आणि मला खड्ड्यात पाडले. या दोघांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस याठिकाणी उपस्थित होत्या, असे पीडित महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा – Chandra Grahan 2023 : 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण; सर्वात मोठी खगोलीय घटना

याबाबत आमदार विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. ही घटना लज्जास्पद आहे. मध्य प्रदेश, मणिपूरमध्ये हेच घडले होते. आता महाराष्ट्रात सुद्धा तेच घडले आहे. भाजपाशासित राज्यात आदिवासींवर अत्याचार करणारी भाजपाचीच टीम तयार होत असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. या प्रकरणात दोषी असलेल्या भाजपा आमदारावर आणि त्यांच्या पत्नीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षहित बाजूला ठेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -