घरताज्या घडामोडीभाजप देगलूर पोटनिवडणूक लढविणार, चंद्रकांत पाटलांची माहिती

भाजप देगलूर पोटनिवडणूक लढविणार, चंद्रकांत पाटलांची माहिती

Subscribe

देगलूर विधानसभेची ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार असून आम्ही त्याची व्यूवहरचना आखली आहे. ७ ऑक्टोबर रोजी आम्ही निवडणूक अर्ज भरू, अशी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. देगलूर पोटनिवडणुकीसाठी आमचे सर्वेक्षण झाले आहे. निवडणूक लढवण्यासाठी १२ जणांची नावे पुढे आली आहेत. त्यात लिंगायत समाजाच्या स्वामींचेही नाव आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून ४ तारखेलाच आम्ही उमेदवाराचे नाव जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येत्या २ ऑक्टोबरपासून पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते विदर्भातील पूरस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर मराठवाड्यातील परिस्थितीची पाहणी करतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पूरग्रस्तांना मदत करण्याचा विषय आल्यावर प्रत्येक वेळी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असते. गुजरातला जसे एक हजार कोटी मिळाले तसे महाराष्ट्राला ७०० कोटी मिळालेआहेत, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – Bypolls : नांदेडच्या देगलूरसह देशातील ३० विधानसभा आणि ३ लोकसभेच्या पोटनिडणुका जाहीर; ३० ऑक्टोबरला मतदान


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -