घरमहाराष्ट्रशरद पवार-पार्थ पवार प्रकरणात आता फडणवीसांची उडी, म्हणाले...

शरद पवार-पार्थ पवार प्रकरणात आता फडणवीसांची उडी, म्हणाले…

Subscribe

शरद पवारांनी नातवाला फटकारल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नातू पार्थ पवार यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन फटकारलं. माझा नातू अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत बुधवारी पवारांनी पार्थला फटकारलं. यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. शिवाय, शरद पवार यांनी सीबीआय चौकशीबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं…हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पण एक नक्की आहे की, त्यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असं सांगितलं आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे,” असं देखील फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यासंदर्भात पत्र देखील त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं. पार्थ पवार यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची पंचाईत झाली होती. पार्थ पवार यांच्या भूमिकेबद्दल विचारलं असता शरद पवारांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व असल्याचं म्हणत फटकारलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -