घरमहाराष्ट्रआता 'या' मंत्र्यांचे घोटाळे समोर आणणार; किरीट सोमय्यांनी थेट नाव घेत दिला...

आता ‘या’ मंत्र्यांचे घोटाळे समोर आणणार; किरीट सोमय्यांनी थेट नाव घेत दिला इशारा

Subscribe

एका मंत्र्यांच्या घोटाळा समोर आणल्यानंतर 'यानंतर आणखी एका मंत्र्याचा नंबर आहे', असं म्हणत किरीट सोमय्या घोटाळे उघडकीस आणत आहेत. अशातच आता येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी थेट सांगितलं.

मागील अनेक दिवसांपासुन भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे समोर आणत आहेत. एका मंत्र्यांच्या घोटाळा समोर आणल्यानंतर ‘यानंतर आणखी एका मंत्र्याचा नंबर आहे’, असं म्हणत किरीट सोमय्या घोटाळे उघडकीस आणत आहेत. अशातच आता येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी थेट सांगितलं.

पुढील दौरा एप्रिलमध्ये होणार आहे. पण तत्पूर्वी पुण्यात जाणार आहे, असं सांगतानाच त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांचं नाव घेतलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमय्यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे चालेल, असं विधान केलं होतं. त्यावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”हे सरकार ५० वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया ५० दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची एक डायरी प्राप्तीकर खात्याच्या हाती लागली. त्यात ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची भेट आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी जाधव प्रकरणाबाबत विचारणा केली होती. त्यावर हा विषय वाढवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते. आता या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेले ५० लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावर भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल’, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

- Advertisement -

”हा विषय फार वाढवण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करतील. जाधव यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे”, अजित पवार यांनी म्हटलं होतं. शिवाय, ‘तरीही या विषयाला पुन्हा का उकळी दिली जात आहे?’ असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला होता.


हेही वाचा – यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री कोण? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -