घरताज्या घडामोडीपोलिसांशी हुज्जत घालणारा युवक खासदार राऊत यांचा मुलगा; निलेश राणेंचा दावा

पोलिसांशी हुज्जत घालणारा युवक खासदार राऊत यांचा मुलगा; निलेश राणेंचा दावा

Subscribe

भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत घालणारा तरुण शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. तसेच हा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत आणि खासदारांचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्यांना धमकी देत आहे. दारू पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारचं. त्या तरूणावर कलम ३५३ आणि १८५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे,’ असे निलेश राणे म्हणाले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले निलेश राणे?

‘सिंधुदुर्गातील कणकवली बाजारपेठेत संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. पोलिसांशी हुज्जत घालणारी व्यक्ती ही १०० टक्के विनायक राऊत यांचा मुलगाच आहे. तो मुलगाही व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांना मुलगा असल्याचे सांगत आहे’, अशी प्रतिक्रिया राणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

‘खासदाराचा मुलगा असल्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. ज्या भाषेत तो तरूण त्या पोलिसांना धमकी देत आहे. त्यानुसार कलम ३५३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. दाऊ पिऊन जर कोणी असे प्रकार करत असेल तर त्याला तुरूंगात टाकलंच पाहिजे,’ असंही ते पुढे म्हणाले आहेत.

- Advertisement -

‘आपण निवडून आलो म्हणजे महाराष्ट्र विकत घेतला असे शिवसेना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे. महाराष्ट्रच आपलं काही देणं लागतो असं हे लोक वागत आहेत,’ असंही राणे यावेळी म्हणाले आहेत.


हेही वाचा – ‘फडणवीसांनी आता मुंगेरीलालची स्वप्नं पाहावीत!’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -