घरताज्या घडामोडीसुप्रिया सुळेंना दुसरं कोणी मोठं झालेलं बघवत नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

सुप्रिया सुळेंना दुसरं कोणी मोठं झालेलं बघवत नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुळेंवर पलटवार केला आहे. सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं दुख: हे आहे की, या महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून सर्वात मोठं कुणी नाही. त्यांचे वडीलचं हे राज्यातले मुख्य आहेत. तेच राज्यामध्ये राजकीय बदल करू शकतात. याला छेद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातला एकनाथ शिंदे नावाचा एक चांगला चेहरा एक स्ट्रॉंग निर्णय घेणारा माणूस आहे आणि त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपद विराजमान केलं. हे सर्वात मोठं दुख: पवार कुटुंबियांचं आहे, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पडळकर म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील फुटले होते. तेव्हा त्यांच्या मागे दोन आमदार ठामपणे उभे राहिले नाहीत. पण शिंदेंच्या मागे एकूण पन्नास आमदार ठामपणे उभे राहिले. त्यामुळे यांचं पोटातलं दुखणं हे वेगळं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतक्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते त्यांना सहन होत नाहीये.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलेलं आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली.

- Advertisement -

ज्या उत्साहाने महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडल्या तर या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : राज ठाकरेंनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचे दर्शन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -