घरमहाराष्ट्रभाजपच्या आमदारांना काय झालंय? पंकजा मुंडें समोरच केलं भलतं वक्तव्यं

भाजपच्या आमदारांना काय झालंय? पंकजा मुंडें समोरच केलं भलतं वक्तव्यं

Subscribe

भाजपमधून राष्ट्रवादीत आणि पुन्हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार सुरेश धस हे आपल्या वक्तृत्वासाठी बीडमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. शाब्दिक कोट्या करुन उपस्थितांमध्ये हशा पिकवण्यात धस चांगलेच पटाईत आहेत. मात्र लोकप्रिय भाषणे करण्याच्या नादात अनेक नेत्यांची जिभ घसरते. त्याप्रमाणेच सुरेश धस यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परळी येथील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासमोरच धस यांनी बिहार मधील लोकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

वक्तव्य ऐकण्यासाठी पाहा व्हिडिओ –

सुरेश धस यांचे बिहारी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

"बिहारचे लोक पेढे वाटतात इथे, मुलं होतात बिहारमध्ये" भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पकंजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासमोरच बिहरी लोकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

Posted by My Mahanagar on Sunday, 6 January 2019

- Advertisement -

विकासकामांचे उदघाटन करत असताना आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादीवर टीका करत होते. टीका करण्याच्या नादात ते म्हणाले की, “पंकजा मुंडे उदघाटन करायला येणार असल्याचे ऐकून एका नगरसेवकाने आधीच नारळ फोडला. दुसऱ्याच्या घरात मुल झाल्यानंतर हे लोक पेढे वाटतात. आपल्याकडे जसे बिहारचे लोक पेढे वाटतात. आपण त्यांना विचारलं की ते म्हणतात मला मुलगा झाला. कुठे झाल विचारलं तर म्हणतात, तिकडं बिहारमध्ये झाला.” या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्यासहीत अनेक महिला देखील उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच महिलांच्याप्रती लज्जा निर्माण करणारे वक्तव्य धस यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


वाचा – भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादबद्दल (रावण नाव कसे पडले)


भाजपच्या आमदारांची बेताल वक्तव्ये

याआधी देखील भाजपचे आमदार राम कदम यांनी मुली पळवून आणण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर आमदार प्रशांत परिचारक यांनी धस यांच्याप्रमाणेच सैन्यदलातील सैनिक सीमेवर असताना त्यांच्या पत्नींना इथे मुले कशी होतात? असे अश्लाघ्य वक्तव्य केले होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका डिसलरीच्या उदघाटनाप्रसंगी ‘महाराजा दारूला महिलेचे नाव दिल्यास ती दारू जास्त चालेल’, असे वक्तव्य केले होते. महिलांबाबतीत वारंवार चुकीचे वक्तव्य केल्यामुळे भाजप आमदारांना नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

- Advertisement -

 


 

अधिक वाचा – ‘गरिबांना सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -