घरदेश-विदेशRafale deal :पुरावे द्या नाहीतर राजीनामे द्या - राहुल गांधी

Rafale deal :पुरावे द्या नाहीतर राजीनामे द्या – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांना अव्हान केले आहे. राफेल करार प्रकरणी पुन्हा राहुल गांधींनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

काँग्रेसने  संरक्षण मंत्री निर्मला सीतारमनवर आरोप लावले आहेत. संरक्षण मंत्री खोटे बोलत असल्याच आरोप यावेळी करण्यात आला. हिंदूस्तान एरोनॅटिक्स लिमिटेडला एक लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात एचएएलला एकही रुपया दिला गेलेला नसल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सुट बुट वाल्या मित्रांना मदत करण्यासाठी एचएएलला कमजोर केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला होता. याच्या एका दिवसानंतरच हा आरोप करण्यात आला. राफेलसंबधीत पुरावे द्या नाहीतर राजीनामे द्या अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे.

काय लिहिले आहे ट्विटमध्ये

जेव्हा तुम्ही एकदा खोट बोलता. त्याला लपवण्यासाठी तुम्हाला अनेकदा खोटं बोलावे लागतात. राफेल कराराबद्दल पंतप्रधांनांनी खोटी माहिती सादर केली आहे. एचएएलला एक लाख कोटींची सरकारने ऑर्डर दिली असल्याचा दावा  सरक्षणमंत्र्यांनी केला होता. मात्र या ऑर्डवर स्वाक्षरी न केल्यामुळे त्याला एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे एचएएल कर्ज काढण्यास भाग पडले असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -